आर्थिक वर्षाकडे सकारात्मक वाटचाल!   

धनंजय दीक्षित

dhananjay@kalyanicapital.com

३१ मार्च २०२५ अखेर संपलेल्या तिमाही व आर्थिक वर्षाच्या आणि १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान जाहीर झालेल्या निकालांचा एक लेखा जोखा तो बनता है!
या तीन कोष्टकांमधून ठळकपणे खालील निष्कर्ष निघू शकतात:

लार्ज कॅप कंपन्या (एकत्रित आकडे कोटी रुपयांमध्ये)

मार्च २०२५ मार्च २०२४ वाढ %
उत्पन्न २८,४०,८३३ २६,९०,१०२ ५.६०
ढोबळ नफा ५१६,५४६ ४५३,०५९ १४.०१
निव्वळ नफा ३५०,६९७ २९७,९२६ १७.७१

मिड कॅप कंपन्या (एकत्रित आकडे कोटी रुपयांमध्ये)

मार्च २०२५ मार्च २०२४ वाढ %
उत्पन्न ९३३,०७९ ८६३,६२२ ८.०४
ढोबळ नफा १४४,७३४ १२५,९८८ १४.८८
निव्वळ नफा ८०,१६१ ७०,४०७ १३.८५

स्मॉल कॅप कंपन्या (एकत्रित आकडे कोटी रुपयांमध्ये)

मार्च २०२५ मार्च २०२४ वाढ %
उत्पन्न ४९४,८४६ ४६२,४६८ ७.००
ढोबळ नफा ६२,६२० ५८,२८६ ७.४४
निव्वळ नफा ४५,५२८ ३३,७६१ ३४.८५
 
१. लार्ज कॅप आणि मिडकॅप कंपन्यांनी उत्पादन खर्चात बर्‍यापैकी कपात करण्यात यश मिळवलेले दिसते कारण ढोबळ नफ्याच्या टक्केवारीत सुधारणा दिसून येत आहे. ह्याउलट स्मॉल कॅप  कंपन्यांना हे विशेष जमलेले दिसत नाही. 
 
२. स्मॉल कॅप  कंपन्यांनी उत्पादनाव्यतिरिक्त खर्चावर कमालीचा अंकुश ठेऊन निव्वळ नफ्याचे प्रमाण मात्र अतिशय उत्तम रीत्या वाढवलेले दिसून येते. ह्या अतिरिक्त खर्चामध्ये व्याजाचा खर्च समाविष्ट असतो जो कमी झाला असण्याची शक्यता वाटते. जर असे असेल तर याचाच अर्थ या कंपन्यांना कर्जाची परतफेड करणे अथवा जास्त व्याजदराच्या कर्जाचे कमी व्याजदराच्या कर्जात रूपांतर करण्यात यश आले असे म्हणता येईल. यापैकी कुठल्याही कृतीमुळे कंपन्यांची आर्थिक स्थिती सबळ झाली असणारच. 

३. तिन्ही कोष्टकांमधून सर्वसाधारण उत्पन्न व नफ्यामध्ये वाढच दिसून येत आहे.

हा गोषवारा साधारणतः २८२० कंपन्यांच्या निकालांचे विश्लेषण करून मांडण्यात आला आहे. अर्थात ही सगळ्या निकालांची सरासरी आहे.... त्यामुळे दहावी, बारावीच्या निकालांप्रमाणे सर्व पास नापासांची ही गोळा बेरीज आहे. तरी सुद्धा जागतिक व्याजदर वरच्या पातळीवर असताना, जगभरात बर्‍याच भागात युद्ध-युद्ध सदृश स्थिती असताना आणि दोन सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थांमधल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कामगिरी खचितच उत्साहवर्धक म्हणता येईल. आता तर आपल्याकडील व्याज दर उतरते आहेत कारण महागाई बर्‍यापैकी रिझर्व बँकेच्या आवाक्यात आली आहे. शिवाय मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावून सुखद धक्का दिला आहे. हे सर्व पाहता २०२५-२६ या वर्षाकडे आशावादी नजरेने पाहायला हरकत नाही असे वाटते.
 

Related Articles